कोल्हापूर –
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते लेखक होते. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण यांचे मागील दोन महिन्यांपासून कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते.
१४ एप्रिल १९३४ रोजी डर्बानमध्ये अरुण गांधी यांचा जन्म झाला. ते पाच वर्षांचे असताना त्यांनी महात्मा गांधी यांना पाहिले होते. सेवाग्राम आश्रमात १९४६ च्या दरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केले. त्यामुळे गांधीजींच्या विचारांचा अरुण यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. अरुण हे सामाजिक-राजकीय कार्यकर्ते होते. त्यांनी माजी केंद्रीय मंत्रीम्हणून देखील कार्यभार सांभाळला होता. मणिलाल गांधी असे त्यांच्या वडिलांचे नाव होते. ते ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. दरम्यान, अरुण यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी ‘द गिफ्ट ऑफ एंगर: अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. अरुण हे १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.