सातारा- राज्यात सर्वदूर उष्णतेची लाट सुरू असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले असतानाच महाबळेश्वरमध्ये तापमान अचानक 12 अंशापर्यंत खाली आले. वेण्णालेक परिसरातील तापमान महाबळेश्वरपेक्षाही खाली आले आहे. वेण्णालेक तापमान अवघ्या 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. ऐन उन्हाळात महाबळेश्वर आणि वेण्णालेक येथील लोकांना थंडीचा अनुभव घेत आहे.
जानेवारी महिन्यातही महाबळेश्वर आणि वेण्णालेकमध्ये तापमान घसरले होते. वेण्णालेक परिसरात 5 अंश, तर संपूर्ण महाबळेश्वर शहरातील सरासरी तापमान 7 अंशांवर आले होते. ही गेल्या दोन वर्षांतील निचांकी तापमानाची नोंद होती. आठवडाभरापूर्वी अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्याला सुद्धा फटका बसला. सातारा शहरासह वाई, पाचगणी, भिलार, जावळी, उत्तर कोरेगावला झोडपून काढले होते. चार दिवस अवकाळीने थैमान घातल्याने शेतीला फटका बसला आहे. अशा परिस्थितीत महाबळेश्वर आणि वेण्णालेक येथील तापमानाचा पार ऐन उन्हाळाच्या हंगामात घसरल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर आणि वेण्णालेकमधील तापमानाचा पार अचानक घसरला
