नागपूर
गडचिरोली आणि वडसा वनविभागात नागरिकांना प्राण्यांना लक्ष्य करुन धुमाकूळ माजवणाऱ्या टी-१४ वाघीणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बचाव पथकाने देसाईगंज वनक्षेत्रात ही कारवाई केली. या वाघीणिने शेतात गवत कामासाठी शेतात गेलेल्या महिलेवर हल्ला करून बळी घेतला होता. वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक मनोज चव्हाण यांनी ‘रेस्क्यू टीम ला पाचारण करीत वाघिणीची शोध मोहीम राबवली. अखेर ६ दिवसांनी ‘टी-१४’ वाघिणीला पकडण्यास वन विभागास यश आले आहे.