मुंबई :- अभिनेता साहिल खान अडचणीत सापडला आहे. एका महिलेवर अश्लिल कमेंट करणे आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. महिलेने अभिनेत्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही देखील केला.
मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये साहिल विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा उपनगरातील रहिवासी असलेल्या महिला तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तिचे फेब्रुवारी २०२३ मध्ये जिममध्ये काही पैशावरून एका महिलेशी भांडण झाले होते. जिम मधील महिला आणि साहिल खान यांनी फिर्यादीला शिवीगाळ आणि धमकी दिली असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. दरम्यान, पैशांवरून सुरु झालेला हा वाद सोशल मीडियापर्यंत गेला. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे, फिर्यादी सोबत वाद घालणाऱ्या महिलेने आणि साहिल खानने तक्रारदारच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट देखील लिहिली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.