मुंबई
वाढत्या महागाईत भर म्हणून आता लसणाचा भाव वाढला आहे. मागणीपेक्षा पुरवठा घटल्याने लसणाच्या किमती तिप्पट झाल्या आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घाऊक बाजारात लसणाचा दर ३० ते ६० रुपये किलो होता. आता हाच दर ६० ते १२० रुपये झाला असून, तो २२० रुपये किलो होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही महिन्यांत यातून दिलासा मिळणार नसल्याचेही सांगण्यात येते. वाशीच्या एपीएमसी बाजारात रोज १७ ते १८ ट्रक लसूण येत आहे. यापूर्वी २४ ते ३० ट्रक बाजारात येत होते. अशातच पुरवठ्यात ३० टक्के घट झाली आहे.