माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरयांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई –

मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वर यांना सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सांताक्रूझ(पूर्व)च्या राजे संभाजी विद्यालय ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास दिशेने त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. टीचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडेश्वर यांचे अंत्यदर्शन घेतले. महाडेश्वर २००२ साली सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून गेले होते. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत महाडेश्वर मुंबईचे होते. २०१९ विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. परंतु अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी ऋतुजा लटके यांच्या विजयात महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top