कर्जत – थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे.मात्र मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. माथेरानमधून पर्यटकांना घेऊन नेरळकडे निघालेल्या गाडीचे इंजिन दोन दिवसांपूर्वी नैरो गेज रुळावरून घसरल्याची घटना जुम्मापट्टी येथे घडली. या घटनेमुळे पर्यटकांचे फार हाल झाल्याने त्यांनी तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली.तसेच या घटनेमुळे त्या दिवशीच्या माथेरान – नेरळ या दोन्ही ट्रेन रद्द कराव्या लागल्या होत्या.
या इंजिन रुळावरून घसरलेल्या मिनी ट्रेनमधून ९५ पर्यटक प्रवास करत होते.३ जून रोजी सायंकाळी या गाडीचे इंजिन रुळावरून घसरले. ते नेरळच्या कार्यशाळेतील यंत्रणेने पुन्हा रूळावर ठेवले. मात्र त्यानंतर रात्री नऊ वाजता पून्हा तसाच प्रकार घडला. त्यामुळे ही मिनी ट्रेन रात्री साडेदहा वाजता नेरळ स्थानकात पोहचली.त्यामुळे पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.तर दुसरी मिनी ट्रेनही वॉटर पाईप स्थानकात रद्द करावी लागली.या गाडीतून ९६ प्रवासी प्रवास करत होते. यात प्रवाशांचे फार हाल झाले.त्यामुळेच त्यांनी तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
माथेरानच्या मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा नँरो गेज रुळावरून घसरले
