नवी दिल्ली- मान्सून ३ दिवस आधीच अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल झाला. त्यानंतर आता तो केरळात ४ जूनपर्यरंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मोसमी पाऊस यंदा तो २० मे पर्यंत अंदमानात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत मान्सून १९ मे रोजी दुपारी २ च्या सुमारास दाखल झाला.
मान्सून अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातही दाखल झाला असून तो वेगाने प्रगती करतो आहे. यानंतर तो बंगालच्या उपसागरासह अंदमान व निकोबार बेटांवर सर्वत्र पुढे जाईल, असे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, मागील वर्षी मान्सून २२ मे रोजी अंदमानात दाखल झाला. यंदा तो ३ दिवस आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे केरळात तो लवकर ये,ईल असा अंदाज आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस होसाळीकर यांना विचारले असता ते म्हणाले मान्सूनच्या वाऱ्याची दिशा व गती यावर त्याच्या पुढच्या प्रवासाचा अंदाज सांगितला जातो. तो अंदमानात लवकर आला म्हणजे केरळात लवकर येईल, असा अंदाज वर्तवता येत नाही.
मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार
