मायावतींच्या भाच्याचे रविवारी लग्न! इतर पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण नाही

लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांचे लग्न रविवारी गुरुग्राममध्ये होणार आहे. या लग्नाचे फक्त बसपाच्या नेत्यांनाच आमंत्रण देण्यात आले असून इतर पक्षांच्या नेत्यांना कोणतेही निमंत्रण देण्यात आले नाही. मायावती यांच्या कुटुंबातील लोकही या लग्नात सहभागी होणार आहेत. मायावतींना हा लग्न सोहळा पूर्णपणे घरगुती करायचा आहे.

28 मार्चला या लग्नाचे रिसेप्शन होणार असून त्यासाठी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी गुप्त ठेवण्यात आली आहे. या यादीत कुणाची नावे आहेत, हे उघड झाले नाही. बसपाचे नेते डॉ. अशोक सिद्धार्थ यांच्या मुलीशी आकाश आनंद यांचा विवाह होणार आहे. सिद्धार्थ यांची कन्या प्रज्ञाने एमबीबीएसची पदवी घेतली आहे. एमडी बनण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आकाश यांचे होणारे सासरे सिद्धार्थ हे मायावती यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. मायावती यांच्या सांगण्यावरूनच सिद्धार्थ यांनी डॉक्टरकी सोडून राजकारणात प्रवेश केला होता.

Scroll to Top