न्यूयॉर्क – मेटाचा सीईओ मार्क झकरबर्ग यांच्या संपत्तीत १९ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८१.७७ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे झुकेरबर्गची एकूण संपत्ती ७०.१ अब्ज डॉलर म्हणजेच ६.३० लाख कोटी रुपयांवरून ८७.३ अब्ज डॉलर म्हणजेच ७.१३ लाख कोटी रुपयांवर झाली आहे. मेटाच्या शेअर्समधील तेजीमुळे मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात रिलायन्सच्या मुकेश अंबानींना मागे टाकून १२ व्या स्थानावर पोहोचले आहेत . यापूर्वी ते १३ व्या क्रमांकावर होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ८२.४ अब्ज डॉलर्सच्या (समारे ६.७३ लाख कोटी) संपत्तीसह १३ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
ब्ल्यूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या टॉप-टेन अब्जाधिशांच्या यादीत अमेरिकन उद्योगपतीच अधिक आहेत. अब्जाधिशांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट २०८ अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर १६२ अब्ज डॉलरसह एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत. जेफ बेजोस तिसऱ्या, बिल गेट्स चौथ्या, वॉरेन बफेट पाचव्या क्रमांकावर, लॅरी एलिशन सहाव्या, स्टीव्ह वॉल्मर सातव्या क्रमांकावर, लॅरी पेज आठव्या क्रमांकावर, सर्गी ब्रिन नवव्या क्रमांकावर आहेत.