मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकलीचे आगमन

कॅलिफोर्निया- फेसबुकची मूळ मालकी असलेल्या मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले. झुकरबर्ग यांच्या पत्नी प्रिसिला चॅन यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. झुकरबर्ग हे तिसऱ्यांदा बाबा झाले. त्यांनी मुलीचा एक फोटो शेअर करत तिचे नाव ऑरेलिया चॅन झुकरबर्ग असल्याचे जाहीर केले.

\’ऑरिलिया चॅन झुकरबर्ग, तुझे या जगात स्वागत आहे. खरेच तू देवाने दिलेला आशीर्वाद आहेस,\’ अशी पोस्ट फेसबुकवर शेअर करत झुकरबर्ग यांनी ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न प्राप्त झाले. मॅक्सिमा आणि ऑगस्ट अशी पहिल्या दोन मुलींची नावे आहेत.

Scroll to Top