मालगाडीची कंचनजंगा एक्प्रेसला धडक! ८ जणांचा मृत्यू ,३० जखमी

कोलकाता

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे आज मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे कंचनजंगा एक्सप्रेसच्या तीन डब्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मालगाडीची धडक जोरदार असल्याने यात एक्स्प्रेसचा एक डबा मालगाडीच्या इंजिनावर गेला. तर इतर दोन डबे रुळावरून घसरले.

आज सकाळी ९च्या सुमारास कंचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात होती. लाल सिग्नलमुळे एक्स्प्रेस सिलीगुडीतील रंगपानी स्थानकाजवळ रुईधासा येथे थांबवण्यात आली तेव्हा हा अपघात झाला .या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तात्काळ युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी लोको पायलटची चौकशी सुरू केली आहे. मालगाडीचा चालक या अपघातात गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या घटनेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले. त्यांनी अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले. हा रेल्वे अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top