मुंबई – मालाडमधील मालवणीच्या गेट क्रमांक ८ जवळ असलेल्या डेपो परिसरात भरधाव बेस्ट बसने एका १७ वर्षीय कॉलेज तरुणीला धडक दिली. या अपघातात या तरुणीचा मृत्यू झाला असून तिचे नाव फरहिन रिझवी (२०) असे आहे. या प्रकरणी बसचालक महादेव ससाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काल शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फरहिन रिझवी ही कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी भरधाव चाललेल्या बेस्ट बसने फरहिनला जोरात धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी बेस्ट बसचालक महादेव ससाणे याला अटक केली आहे.
मालवणीत बेस्टच्या धडकेत कॉलेज तरुणीचा मृत्यू
