मुंबई – मुंबईच्या मालाड येथील आनंद नगर आणि आप्पापाडा येथील झोपड्यांना आज भीषण आग लागली. यावेळी एकापाठोपाठ १५ गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत जिवीतहानी झाली नाही. मात्र अनेक झोपड्या जाळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात स्फोटांचे आवाज आणि काळ्या धुराचे लोट निघताना दिसत होते.
अग्निशमन अधिकार्यांना संध्याकाळी ४:५२ च्या सुमारास आनंद नगरमध्ये आग लागल्याचा पहिला फोन आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरु केले आणि आग आटोक्यात आणली.