मावळमध्ये उद्योगपतीची भरदिवसा हत्या

मावळ – मावळ तालुक्यातील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर आज भरदुपारी तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने वार केला गेला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाळ जोडलेल्या किशोर आवारे यांनी सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून राजकारणातील आपले स्थान पक्के केले होते. आज भरदुपारी अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर गोळीबार व कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top