माहीम रेल्वे स्थानकातील
पादचारी पूल आजपासून बंद

मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर उत्तरेकडील बाजूला असलेला पादचारी पूल उद्या शुक्रवार ३ मार्चपासून प्रवाशांना वापरण्यासाठी बंद करण्यात येणार आहे.कारण याच फलाटावरील दक्षिणेकडील पादचारी पूल नवीन जिना आणि एस्केलेटर बसविण्यासाठी तोडला जाणार आहे.

हा पूल बंद करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी फलाट क्रमांक १ वर असलेल्या दक्षिण-पूर्व बाजूस असलेल्या पायर्‍यांचा पादचारी पूल म्हणून वापर करावा असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Scroll to Top