नंदुरबार- नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते. इतर राज्यात मिरची निर्यात केली जाते, परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला देखील बसला आहे. जवळपास ५० लाखांचे झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
व्यापा-यांनी शेतकऱ्यांकडून मिरची विकत घेऊन सुकवण्यासाठी पथारीवर टाकली होती.परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली. पथारीवर सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसामुळे खराब झाली.