मी ईडीला अजिबात घाबरत नाही! कवितांचा केंद्र सरकारवर पलटवार

हैद्राबाद -केंद्राच्या अखत्यारीतील तपास यंत्रणांचे धोरण पक्षपाती आहे.कारण देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का छापे टाकले जातात? असा सवाल करून मी ईडीला अजिबात घाबरत नाही असे ईडीच्या रडारवर असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी सांगितले. कविता याना ईडीने मद्य घोटाळ्या प्रकरणी चौक्शीसाठी समन्स जारी केले आहे. त्या ११ मार्चला ईडी समोर हजार होणार आहेत.
दिल्लीतील मद्य घोटाळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि टीआरएसएसच्या आमदार के. कविता याना ईडीने समन्स पाठवून ९ मार्चला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजार राहायला सांगितले होते. मात्र त्यांनी ११ मार्च पर्यंत वेळ मागून घेतली आहे. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे . त्यांच्या मागे ईडी आणि सीबी आय सारख्या तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. मला ईडीने समन्स पाठवले आहेत . पण मी ईडीला अजिबात घाबरत नाही. कारण मद्य घोटाळ्याशी माझा दूरान्वयही संबंध नाही . सध्या अटकेत असलेल्या पिलाई आणि इतर दोघांशी माझा कोणत्याही प्रकारे संबंध नाही . मला विनाकारण या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे . माझ्या वडिलांनी विरोधी पक्ष नेत्यांशी भेटीगाठी सुरु केल्यात त्यामुळेच माझ्या मागे ईडी लावण्यात आली असा आरोपही के कविता यांनी केला आहे.

Scroll to Top