मुंबईतील ११ वॉर्डमध्ये ९ मार्च
ते ११ मार्चदरम्यान पाणी कपात

मुंबई

मुंबईतील ११ वॉर्डमध्ये ९ मार्च ते ११ मार्चदरम्यान १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीकरणासाठी ही पाणी कपात करण्यात येणार आहे. यात ए वॉर्ड, बी वॉर्ड, ई वॉर्ड, एफ-दक्षिण वॉर्ड, एफ-उत्तर वॉर्ड, टी वॉर्ड, एस वॉर्ड, एन वार्ड, एल वॉर्ड, एम-पूर्व वॉर्ड, एम-पश्चिम यांचा समावेश आहे.

ठाणे महानगरपलिकेतर्फे कोपरी पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू असताना मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाची ‘मुंबई २’ जलवाहिनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, ११ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला.

Scroll to Top