सुरत
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (एचएसआर) कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग म्हणून एचएसआर ट्रॅक टाकण्यासाठी जपान रेल्वे तांत्रिक सेवाच्या (जेएआरटीएस) २० तज्ज्ञांकडून सुमारे १००० भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण टी-२ २३७ किमी वापी-वडोदरा पॅकेजसाठी दिले जात आहे, ज्यामध्ये दीर्घकाळ चालणारे चक्र आणि सुलभ देखभाल क्षमतेसह बॅलेस्टलेस स्लॅब ट्रॅक सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.
जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) या प्रकल्पासाठी निधी देत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी जेएआरटीएसचे नामांकन करण्यात आले आहे. भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांना ट्रॅक वर्क, साइट मॅनेजरसाठी प्रशिक्षण, ट्रॅक स्लॅब मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रबलित काँक्रीट ट्रॅक-बेड बांधकाम यासह १५ हून अधिक विविध गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. यासाठी खास सुरत येथील कारशेडमध्ये तीन ट्रेल लाइन्ससह प्रशिक्षण सुविधा उभारण्यात आली आहे. त्यानंतर हे प्रशिक्षित अभियंते ट्रॅक बांधकाम साइटवर काम करणार असून ते जपानी शिंकनसेन एचएसआर तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात मदत करतील.