मुंबई – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमघ्ये मोठा बदल झाला आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगतापांना हटवले असून ही जबाबदारी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आज पत्रक काढून या निवडीची घोषणा केली. तसेच गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची तर पुद्दुचेरी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड
