मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी 25 वर्षांपासून भाजपामुळे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली. मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला 50 जागाही जिंकता येणार नाही, मुंबई महापालिकेत भाजपाच महापौर बसणार असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अशिष शेलार यांनी आज केला. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुंबई भाजपची कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत ते भाषण करत होते.
पुढे अशिष शेलार म्हणाले की, आमच्यावर टीका करणाऱ्यांचे स्वागत आम्ही करतो. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे.पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.आम्ही धरसोड करणारे नाहीत. हिन्दूत्वाच्या मुद्यावर आम्ही तुमच्या सोबत होते. आमच्यामुळे तुम्ही उंच गाठली.आता तुम्हाला घराबाहेर पडून भडकावे लागत आहेत. केजरीवाल आणि के, चंद्रशेखर राव यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता ठाकरे गट पालिका निवडणुकीत 50 जागा मिळणार नाही. राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोलले पाहिजे असे नाही. ही धरसोड वृत्ती नाही तर जे सुटलेले आहेत. त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचे धोरण आहे. क्लीन नोट पॉलिसी हे धोरण चर्चेअंती झालेले आहे. तज्ज्ञांनी यावर मत दिले आहे. हे क्लिन नोट पॉलिसीच्या आधारावर होत आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजार रुपयांची नोट दिली. त्याचवेळी ही तात्पुर्ती व्यवस्था आहे. याबाबतचा निर्णय मोदी सरकार आणि आरबीआयने घोषीत केला होता.असे शेलार म्हणाले,