मुंबई-सुरत फ्लाईंग राणी ४४ वर्षांनी विश्रांती घेतली

मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या ४४ वर्षांपासून मुंबई सेंट्रल-सुरत दरम्यान दररोज धावणारी देशातील पहिली डबल डेकर फ्लाईंग राणी ट्रेनने आजपासून विश्रांती घेतली आहे. पश्चिम रेल्वेने डबल डेकर फ्लाईंग राणीला निवृत्त करून अत्याधुनिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्कृष्ट अशी लिंक हॉफमन बुश (एलएचबी) कोच असलेली ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्शवभूमीवर रेल्वे राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांनी आज सायंकाळी मुंबई सेंट्रलवरून एलएचबी डबे असलेल्या फ्लाईंग एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
१९८० च्या दशकात सर्वात वेगवान ट्रेन असा बहुमान मिळालेली ही फ्लाईंग राणी बदलत्या तंत्रज्ञानामुळे कालबाह्य ठरू लागली होती. मुंबई सेंट्रल-सुरत मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा म्हणून पश्चिम रेल्वेने फ्लाइंग राणी एक्स्प्रेसच्या पारंपरिक रेक ऐवजी आता अत्याधुनिक एलएचबी डबे जोडण्याचे ठरवले. त्यामुळे वर्षानुवर्षे साध्या पद्धतीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top