मुंबई- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता या मागणीचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी 15 एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता नाना शंकरशेठ चौकात जगन्नाथ (नाना) शंकरशेठ प्रतिष्ठान आंदोलन करणार आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नाना शंकरशेठ यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर ‘स्वर्गालोकात भेटअसा भावनिक आशयाचा मचकूर लिहिला आहे. या पोस्टरवर बाळासाहेबांच्या तोंडी लिहिले आहे की,‘ नमस्कार नाना... मी माझ्या भाषणात अनेकदा आपल्या नामकरण विषयी बोललो होतो. शासनकर्त्यांनो नानांचे नाव टर्मिनसला द्याच. माझी इच्छा कधी पूर्ण करणार आहात. त्याशिवाय मला शांती मिळणार नाही.