ठाणे
रसायन घेऊन जाणारा टँकर आज पहाटे मुंब्रा बायपासवर पलटी झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर मुंब्रा बायपास रस्त्याशेजारच्या नाल्यामध्ये उलटला. सल्फ्युरिक ॲसिडचा हा टँकर बोईसरवरुन जालन्याला मुंब्रा बायपास मार्गे जात होता. या अपघातमध्ये वाहन चालक ब्रिजेश सरोळ याला दुखापत झाली आहे. या अपघातामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. टँकरमधून केमिकलचा उग्र वास आणि धूर येत होता.