मुरबाड – मुरबाड शहरातली व राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणावर वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आज मुरबाड नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम व एमआयडीसी विभागाने मोठ्या पोलिसांचा फौज फाटा घेऊन संयुक्त कारवाई केली आणि शहर, राष्ट्रीय महामार्ग तसेच एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम यशस्वी रीत्या राबवली. या कारवाईचे एका बाजूने स्वागत होत असताना, दुसरी बाजू पहिली तर शेकडो तरुण महामार्गालगत उद्योग व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत असताना तरुण वर्गावर पुन्हा बेकरीचे कुऱ्हाड कोसळली आहे.
मुरबाड शहरातली फुटपाथ मोकळे झाले असून फुटपाथ ने मोकळा श्वास घेतल्याच्या काही नागरिकांनी प्रतिक्रीया दिल्या तर या करवाई विरोधात आर पी आय (सेवयु) तसेच लेबर फ्रंट युनियनचे अध्यक्ष रविंद्र चंदणे यांनी कारवाईचे स्वागत केले. मात्र कारवाई ही हुकूमशाही पद्धतीने केल्याचा आरोप करत मुरबाड नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे कधी पाडणार असा प्रश्न उपस्थित केला. मुरबाड नगरपंचायत हद्दीतील व राष्ट्रीय महामार्गावरील पत्र्याची, ताडपत्रीची अतिक्रमणे हटविली.