जॉर्ज
दक्षिण अमेरिकेतील गयाना देशातील एका मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. ही घटना रविवारी रात्री घडली. या आगीत २० विद्यार्थिनींचा जळून मृत्यू झाला तर १२ पेक्षा जास्त विद्यार्थिनी जखमी झाल्या. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हे वसतिगृह महदिया शहरात आहे. येथील विद्यार्थिनी गाढ झोपेत असताना ही घटना घडली.
यावेळी अचानक आग लागल्याने अनेक विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्या आतच अडकल्या व त्यांच्या होरपळून मृत्यू झाला.