जेद्दाह – इस्माईल हनियाच्या मृत्यूसंदर्भात इराणच्या आवाहनावर मुस्लीम देशांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ओआयसीची बैठक सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झाली . या बैठकीच्या अवघ्या २४ तासांतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा सूर बदलला आहे.आतापर्यंत गाझामधील युद्धविरामाबद्दल संकोच करणारे नेतन्याहू आता युद्धविराम चर्चेसाठी तयार झाले आहेत.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, इस्रायल गाझामध्ये युद्धविराम चर्चा पुन्हा सुरू करण्यास तयार आहे.अमेरिका,कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांच्या मागणीनुसार इस्रायलने १५ ऑगस्टला चर्चेसाठी एक शिष्टमंडळ पाठवण्याचे मान्य केले आहे.याआधी गाझामधील युद्धविरामात मध्यस्थी करणाऱ्या अमेरिका,इजिप्त आणि कतार यांनी संयुक्त निवेदन जारी केले होते. या निवेदनात इस्रायल आणि हमासच्या नेत्यांना पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते.