मेक्सिको – मेक्सिकोतील गुआनाजुआटो इथे सशस्त्र हल्लेखोरांनी एका बारवर हल्ला केला. यावेळी त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये सात पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
एल एस्टाडिओ बारमध्ये शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११ च्या सुमारास हा हल्ला झाला. हा हल्ला दोन हल्लेखोरांनी केला. सेलाया-क्वेरेटारो शहरांना जोडणार्या महामार्गावरील बारमध्ये हल्लेखोरांनी घुसून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. यात १० जण मृत्युमुखी पडले. पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, गुआनाजुआटो हे समृद्ध राज्य मेक्सिकोच्या पर्यटन स्थळांचे माहेरघर आहे. मात्र, ते आता देशातील सर्वात रक्तरंजित राज्य बनले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येथे अशीच घटना घडली होती. यावेळी तेथे झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार तर दोन जण जखमी झाले होते.