मेक्सिको: उत्तर मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्निया येथे शनिवारी एका कार शोमध्ये झालेल्या गोळीबारात ११ रोड रेसर्स ठार झाले तर ९ जण जखमी झाले. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंटे भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो दरम्यान हा हल्ला झाला.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेला हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंटे भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो दरम्यान हा हल्ला झाला. हल्लेखोर ग्रे व्हॅनमधून आले होते. त्यावेळी रेसमध्ये सहभागी झालेले रेसर्स गॅस स्टेशनवर उभे होते. त्यानंतर हल्लेखोरांनी उपस्थितांवर गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर राज्य पोलीस, मरीन, अग्निशमन दल आणि मेक्सिकन रेड क्रॉसचे पथक घटनास्थळी पोहोचले. राज्याचे ऍटर्नी जनरल रिकार्डो इव्हान कार्पियो-सँचेझ यांनी गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार केली असल्याचे महापौर अरमांडो अयाला रोबल्स यांनी सांगितले. पीडितांची ओळख आणि राष्ट्रीयत्व अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. मेक्सिकन रेड क्रॉसने जखमींना उत्तर बाजा कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.