पोर्ट लुईस – मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे सकाळी मॉरिशसमध्ये दाखल झाले होते. या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथदेखील उपस्थित होते.
मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, ‘या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता?’
त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सायंकाळी मॉरिशसमधील
मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी झाले होते.
मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
