पोर्ट लुई –
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २८ मे रोजी ण स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन होत असून त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार पुढील पिढीत नेण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन होत असते. यंदा ते मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई येथे होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थितीही असेल. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा, असे विविध उपक्रम राबवून अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.