मुंबई – शेअर बाजारात आजही मोठे चढ-उतार झाले. दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २३० अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ३४ अंकांची घसरण झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत मात्र आज वाढ झाली. मिडकॅप निर्देशांक सुमारे ३०० अंकांनी वाढून ५९,२२५ वर पोहोचला. तर स्मॉलकॅप निर्देशांक १०० अंकांनी वाढून १९,०२० अंकांवर बंद झाला.
परंतु सेन्सेक्स २३० अंकांनी घसरून ८१,३८१ वर तर निफ्टी ३४ अंकांच्या घसरणीसह २४, ९६४ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीत ३५८ अंकांनी घसरून ५१,१७२ अंकांवर बंद झाला.
