मोदींनी उद्घाटन केलेला महामार्ग पाण्याखाली

बंगळुरू- सहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेला कर्नाटकातील बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्ग मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. त्यामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना नाहक त्रास झाला.

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्ग उद्घाटन केले होते. रामनगर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाचे तळावात रुपांतर झाले. ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था रेंगाळली. 8,400 कोटी रुपये खर्चून बांधलेला एक्स्प्रेस वे पूर्णपणे पूर्ण झाला. या महामार्गाच्या उद्घाटनादरम्यान मोदींनी व्यासपीठावरुन महामार्गाबाबत अनेक मोठे दावे केले होते. तसेच महामार्गावर पाणी साचणार नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला होता. पंरतु या दाव्याची हवा कालच्या पावसाने काढली.

Scroll to Top