मोबाईलच्या नादात तरुणीचा
पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

पुणे

पुण्यामध्ये मोबाईलच्या नादात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सासवड शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनीलनाना जगताप यांची मुलगी अनुष्का जगताप (२१) हिचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जगताप कुटुंबीय राहत असलेल्या उत्तम सोसायटीच्या मागच्या बाजूला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अनुष्का पडल्याची घटना घडली. त्यानंतर पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ४ एप्रिल रोजी तिचे निधन झाले. सर्व कुटुंबीय नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले असता अनुष्का हिला फोन आला म्हणून गडबडीत ती खाली जात होती. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बीएसस्सी पदवी घेतली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी येथे सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

Scroll to Top