निपाणी
मोबाईल चार्जिंग करताना श्रीपेवाडी येथील एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. आकाश शिवदास संकपाळ (वय 27) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. या घटनेची नोंद बसवेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे. मोबाईल चार्जिंगसाठी लावताना आकाशला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तो जागीच कोसळला. त्याला निपाणीतील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यानी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका असा परिवार आहे.