अमरावती- आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील चिंता कुप्पम गावात अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात वडिलांची हत्या केली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, १७ वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांकडे मोबाईल फोन दुरुस्त करण्यासाठी ५०० रुपये मागितले होते. मात्र त्याच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात काठीने वार केले.
या मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामकुप्पम पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई सुरू केली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवाना केले. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, मुलाला मानसिक आजार असून तो वडिलांबरोबर रोजंदारीवर काम करायचा.