मोरबे धरणाची स्थिती चिंताजनक ३८ दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक

नवी मुंबई- नवी मुंबई शहर व मोरबे धरण परिसरात पावसाने दडी मारल्याने पालिका प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना जपून पाण्याचा वापर करण्याचे आवाहन पालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी केले आहे.यंदा मात्र पालिकेने पाणीकपात सुरू केली असताना आता फक्त ३८ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे.

सध्या नवी मुंबई पालिकेच्या आठही विभागांत आठवड्यातून तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.सद्यस्थितीत मोरबे धरणात फक्त २५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून फक्त ३८ दिवस पुरेल एवढाच म्हणजेच २५ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सरासरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोरबे धरण परिसरात पावसाला सुरुवात होते. मात्र यावेळी पावसाने दडी मारल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top