रबात – मोरोक्कोत ८ सप्टेंबर रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा २,८०० च्या वर गेला आहे. मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. या ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू मर्राकेशपासून ७२ किलोमीटर अंतरावरील डोंगराळ भागात होता. या भूकंपाला ३ दिवस उलटून गेले तरी अजूनही बचावकार्य सुरू आहे. स्पेन, युनायटेड किंगडम आणि कतार या देशांची बचावपथके मदतकार्य करत आहेत. या भूकंपाचा सर्वाधिक फटका दुर्गम भागाला बसल्याने तिथे बचाव पथकांना पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत.
मोरोक्कोच्या भूकंपात २,८०० हून अधिक मृत
