नांदेड – यंदा पाऊस कमी पडल्याने मूग डाळ महाग होण्याची शक्यता आहे. अल्प पावसामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मागील वर्षांपेक्षा मूग डाळीची प्रतही खालावली आहे. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दाखल झालेल्या नवीन मुगाला आताच सरासरी क्विंटलमागे १०.५० हजार रूपये मिळत आहे.
नांदेडच्या बाजार समितीत १५ ऑगस्ट पासून नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे.या मुगाला क्विंटलमागे १०,५०० रूपये भाव मिळत आहे.त्यामुळे आता डाळीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. देगलुर बाजार समितीकडून यावर्षी गुरुवार २१ सप्टेंबरला खरीप हंगामातील मालाच्या खरेदी- विक्रीचा मुहूर्त करण्यात आला.यावेळी तर मुगाला क्विंटलमागे १५ हजार मिळाला.त्यामुळे आता भविष्यात मूग डाळीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
यंदा मूग डाळ महागणार! पावसाविना उत्पन्न घटले
