मारियुपोल- रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या मारियुपोल शहरची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैर केली. त्यावेळी त्यांनी तेथील लोकांनी संवाद देखील साधला. गेल्या मे महिन्यापासून रशियन लष्कराने मारियुपोल शहर आपल्या ताब्यात घेतले आहे.
पुतिन हेलिकॉप्टरद्वारे मारियुपोल शहरात पोहोचले. तेथे त्यांनी स्वत: कार शहरातील अनेक भागातून चालविली. यावेळी पुतिन यांनी शहरात अनेक भागांत आपली कार थांबवली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. लोकांशी बोलून आणि शहरात कार चालवून पुतिन यांनी लोकांना संदेश द्यायचा आहे की, पश्चिम युरोपीय देशांची एकजूट आणि एकत्रीकरण असूनही ते युक्रेनच्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीला ते तयार आहेत. दरम्यान, क्रिमियाने युक्रेनपासून वेगळे होण्याचा काल नववा वर्धापन दिन साजरा केला. या दिवशी पुतिन यांनी काल क्रिमियामध्ये हजेरी लावली. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केले होते.