येऊरच्या मामा-भांजे डोंगरावरील धर्मस्थळ अनधिकृत बांधकाम तोडणार

…तर शंकर मंदिर उभारू मनविसेनेचा इशारा !

ठाणे – राज्यात अनधिकृत मशिदी,मजारी,दर्गे,पीर उभारून जागा बळकावण्याच्या प्रकाराविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ठाण्यातील येऊरच्या मामा-भांजे डोंगरावरील ‘लॅन्ड जिहाद ‘ उघडकीस आणला आहे.येथील दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात असलेले अतिक्रमण हटवा,
अन्यथा दर्ग्या शेजारी शंकर मंदिर उभारू असा इशारा दिला होता.याची प्रशासनाने तत्काळ दखल घेत या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची लेखी हमी मनसेला दिली असल्याची माहिती मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली आहे.

अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्त्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तात्काळ हटवावे अन्यथा दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता.
भारतीय वायुसेनेच्या अधिकार्‍यांनी पत्रव्यवहार करून वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरित हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र,ढिम्म प्रशासनाने रमजान सण असल्याचे निमित्त सांगून कारवाईत चालढकल केली. त्यामुळे, मनविसेने थेट वनविभागाकडे निवेदन देऊन या अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम त्वरीत हटवण्याची मागणी केली.त्यानंतर दोन दिवसांत आता प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे लेखी पत्र मनविसेला दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top