रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्प सोमवारपासून पात्रतेची अंतिम यादी

मुंबई – घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांसोबत करार करण्यात येणार आहे. त्यांची घरे रिकामी करण्यात येणार आहेत.रमाबाई नगरातील १६ हजार ५७५ झोपड्यांचा पुनर्विकास झोपु आणि मुंबई एमएमआरडीए संयुक्त भागिदारी तत्त्वावर केला जात आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणाला अडसर ठरणाऱ्या १ हजार ६९४ झोपड्यांचे पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रमाने सर्वेक्षण पूर्ण करून त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या झोपड्या पाडून जागा रिकामी करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणास सुरुवात करता येईल. त्यानुसार झोपुने १६ हजार ५७५ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून पहिल्या टप्प्यात थेट विस्थापित होणाऱ्या १ हजार ६९४ रहिवाशांपैकी १ हजार ०२९ पात्र रहिवाशांची यादी प्रसिद्ध केलेले आहे. या पात्र रहिवाशांसोबत एमएमआरडीए करारनामा करण्यात येणार आहे.