नवी दिल्ली – 16 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या विज्ञान भवनात पोहोचले आणि त्यांनी आयएएस अधिकाऱ्यांना 33 मिनिटे मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदी म्हणाले की,सत्तेत आलेल्या राजकीय पक्षावर लक्ष्य ठेवा. तो करदात्यांच्या पैशाचा वापर स्वतःच्या पक्षासाठी करत आहे की, देशहितासाठी हे तुम्हाला पाहावे लागेल. सरकार पटेल ज्या ब्यूरोक्रेसीला स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हणत होते, ते साध्य करायचे आहे. ब्यूरोक्रेसीकडून चूक झाली तर देशाचा संपूर्ण पैसा लुटला जाईल.
त्यावेळी मोदी अधिकाऱ्यांना म्हणाले की, देशाने तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला खूप मोठी संधी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरवत काम करा. तुमच्या सेवेत निर्णयांचा आधार केवळ देशहित असला पाहिजे. सरकारच सर्वकाही करेल असा पूर्वी विचार होता.आता सरकार सर्वांसाठी करेल असा विचार आहे.आता सरकार वेळ आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करत आहे.आजच्या सरकारचे ध्येय प्रथम देश आणि नागरिक असून प्राधान्य वंचितांना आहे. ही मागील व्यवस्थेची देण होती की, देशात 4 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन, नकली रेशन कार्ड तयार झाले होते. अल्पसंख्यक मंत्रालय 30 लाखांहून अधिक बोगस तरुणाना शिष्यवृत्तीचा लाभ देत होते.आज आपण सर्वांच्या प्रयत्नाने व्यवस्था बदलली आहे.देशातील 3 लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचलेत. आज हा पैसा गरिबांच्या कामाला येत आहे. त्यांचे जीवन सुलभ बनत आहे. आज तुम्ही किती कार्यक्षम आहात याचे आव्हान नाही. आव्हान उणिवांवर मात कशी करायची हे ठरवण्याचे असल्याचे मोदी म्हणाले.