जयपूर- गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांत सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असताना आज पहाटे पुन्हा राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अरुणाचलच्या चांगलांगमध्ये भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे, तर राजस्थानच्या बिकानेरमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की,‘आज पहाटे 2.16 वाजता बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची खोली जमिनीच्या आत आठ किमी होती. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे पहाटे 1.45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची खोली जमिनीच्या आत 76 किमी होती.` दोन दिवसांपूर्वी अरुणाचलच्या चांगलांगमध्ये गुरुवारीही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी दोनच्या सुमारास 10 किमी खोलीवर भूकंप झाला. त्याचवेळी भूकंपाची तीव्रता 4.2 नोंदवण्यात आली. शुक्रवारी सकाळी 10.28 वाजता छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यातील भाटगाव शहर आणि आसपासच्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
राजस्थान, अरुणाचलमध्ये