राजाराम साखर कारखाना निवडणुकीत महाडिक गटाने विजयी गुलाल उधळला

कोल्हापूर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली आहे. महाडिकांनी सतेज पाटील यांच्या गटाला धोबीपछाड दिली आहे. महादेव महाडिक यांच्यासह महाडिक गटाचे सर्व उमेदवार निवडून आल्याने कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला. आज मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासून महाडिक गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. स्वतः महादेव महाडिक हे संस्था गटातून विजयी झाले. त्यांनी सचिन पाटील यांचा पराभव केला. महाडिक गटाचे विजयी उमेदवार – विजय भोसले 6803, संजय मगदूम 6651, शिवाजी पाटील 6692, सर्जेराव भंडारे 6518, आमल महादेवराव महाडिक 6936, मारुती गोविंदा चौघुले 6755, विश्‍वास ईडकर 6610, वैष्णवी नाईक, 6837, कल्पना पाटील 6811, किडगावकर 6760, विलास जाधव 6548, सर्जेराव पाटील 6546, तानाजी पाटील 6636, दिलीपराव पाटील 6665, मीनाक्षी पाटील 6593, दिलीप उलपे 6742, नारायण चव्हाण 6545 संतोष पाटील 6870, देवप्पा तानगे 6884, नंदकुमार भोपळे 6599.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top