राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांना सरकारची परवानगी

मुंबई – पावसामुळे पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता सरकारने हा आपला आदेश मागे घेत या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, या निवडणुका घेताना मतदारांच्या अंतिम यादीसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे सभासद काही शेतीच्या कामांत सहभागी नसतात. पावसाळ्यातही गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुका घेण्यास काहीच हरकत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळेच या निवडणुकांना परवानगी देण्यात आली आहे. याआधी २५० पेक्षा जास्त सभासद संख्या आलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत बंदी घातली होती. ही बंदी आता उठवली आहे.त्यामुळे राज्यातील साधारण ४९,३३३ सोसायट्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व २५० पेक्षा जास्त सभासद असणार्‍या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. सहकार, वस्त्रोद्योग आणि मार्केटिंग विभागाने गृहनिर्माण संस्थांना पावसाळ्यातही निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. या निवडणुकीत मतदार यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. राज्यात एकूण ८२,६३१ गृहनिर्माण सोसायट्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top