पुणे : राज्यातून मुली आणि महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. मार्च महिन्यामध्ये राज्यातील २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. तसेच मागील तीन महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही एक चिंताजनक बाब असून, ह्यामध्ये मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. चाकणकर यांनी रविवारी १४ मे रोजी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
चाकणकर म्हणाल्या की, या महाराष्ट्र राज्यातून १६ ते ३५ वयाच्या मुली महिला बेपत्ता होत असल्याचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ह्यामध्ये मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असण्याची शक्यता आहे.