राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस

मुंबई
राज्यात मधूनमधून कोसळणारा पाऊस आता पुढील पाच दिवस आणखी जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने आज सांगितले. कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भामधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि मराठवाडा आणि इतर काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतातही तो कायम आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह आजबाजूच्या परिसरात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच या परिसरात जोरदार पावसाला सुरू झाली. पेण, पनवेल, उरणसह रायगडच्या अनेक भागात रात्रीपासून पाऊस कोसळला. बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात मधूनमधून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top