नवी दिल्ली – ‘अंगाला तेल लावलेले पहिलवान’ अशी राजकारणात ओळख असलेल्या शरद पवारांना, कुस्तीगीर संघटनांच्या राजकारणात मात्र चीतपट व्हावे लागले. कारण भारतीय कुस्ती महासंघाकडून शरद पवार गटाच्या राज्य कुस्तीगीर संघटनेची मान्यताच रद्द करण्यात आली आहे. पवारांसाठी हा एक मोठा धक्का आहे.
भारतीय कुस्ती महासंघ आणि राज्य कुस्तीगीर संघटना यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काहींना काही कारणांवरून या दोन संघटनांमध्ये वाद होतच असतात. अशाच एका वादामुळे भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर संघटनेला नोटीस बजावली होती. मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आजच्या भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्वसाधारण सभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. अखेर सर्वानुमते राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा राज्य कुस्तीगीर संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्दकुस्ती महासंघाकडून पवार चितपट
